जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन; वार्षिक सभेचेही आयोजन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बुरुडगांव रोड येथे उभारण्यात आलेल्या नूतन केमिस्ट भवनाचे उद्घाटन रविवार, दि. 19 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांसाठी अनेक वर्षापासूनची ही स्वप्नपूर्ती होणार असून, हे भवन त्यांच्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून, या माध्यमातून संघटनात्मक बळकटीसह विविध उपक्रमांना चालना मिळणार आहे.
या केमिस्ट भवनाचे उद्घाटन अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे तसेच राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिलजी नावंदर, एम.आय.ओ.सी.डी. सदस्य अजित पारख, उपाध्यक्ष सेंल झोन ऑफ एम.एस.सी.डी.ए. शशांक रासकर, संघटक सचिव शशांक रासकर, औषध निरीक्षक (अन्न व औषध प्रशासन) जावेद शेख, औषध निरीक्षक सोमनाथ मुळे, ए.आय.ओ.सी.डी. सदस्य अजित पारख तसेच ओमप्रकाश गुलाटी ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र गुलाटी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नूतन केमिस्ट भवन हे केवळ कार्यालयीन जागा नसून, जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांसाठी संवाद, नियोजन आणि प्रशिक्षण यांचे केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. या भवनामुळे संघटनात्मक कार्य अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, विविध सामाजिक व व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव आबासाहेब बेद्रे व खजिनदार प्रशांत उबाळे यांनी जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, केमिस्ट असोसिएशनची वार्षिक सभा नक्षत्र लॉन व सांस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष सुर्यकांत भुजाडी, गणेश वाणी, अतुल चांगले, सहसचिव सचिन शिंदे, शहर उपाध्यक्ष भरत सुपेकर, शहर सचिव मनिष सोमाणी, शहर खजिनदार मनोज खेडकर, शहर सहसचिव मनिषा महेश आठरे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, जिल्हा, शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनचे सदस्य आणि संयुक्त केमिस्ट भवन निर्माण समितीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
