सांघिक प्रकारात पटकाविला तृतीय क्रमांक
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन जिल्हा क्रिडा परिषद व पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय (पुणे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेत 2024-25 भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी यश संपादन केले. सांघिक प्रकारात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन खेळाडूंनी तृतीय क्रमांक पटकाविला.
नुकतेच पुणे येथे ही स्पर्धा पार पडली. यामध्ये आयुष पगारे (कर्णधार), ईशांत गर्जे, जयेश पाटोळे, अर्श मुलानी, अर्पित बेलेकर, आर्यन मोकल या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना प्रशिक्षक शुभम करपे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे विश्वस्त बाळासाहेब खोमणे, प्राचार्य अंजली बोधक यांनी शालेय खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.