• Mon. Jul 21st, 2025

राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या खेळाडूंचे यश

ByMirror

Dec 4, 2023

रोशनी शेख हिला शॉटगन डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक

अहमदनगर शूटिंग क्लबच्या 12 खेळाडूंची इंडियन टीम ट्रायल्स करिता निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- 66 व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन मध्ये अहमदनगर शूटिंग क्लबच्या 12 खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन यश संपादन केले. यामध्ये रोशनी शिरास शेख हिने शॉटगन डबल ट्रॅप खेळ प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. ती या खेळप्रकारात सुवर्णपदक पटकाविणारी जिल्ह्याची पहिली महिला शॉटगन खेळाडू ठरली आहे.


राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा नुकतीच दिल्ली येथे पार पडली. यामध्ये देशातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. अहमदनगरच्या खेळाडूंनी या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचा दबदबा कायम राखून यश प्राप्त केले. 10 मीटर एअर रायफल शूटिंग खेळ प्रकारात यश राहुल कदम (610.9 गुण), पार्थ धीरज छाजेड (589.6 गुण), विराज पुरण चव्हाण (605 गुण), तेजसकुमार घनश्‍याम किरगत (599.2 गुण), गौरव गोकुळ घोडके (590.1 गुण), नैतिक विनोद नागरगोजे (604.8 गुण), चैतन्य मनोज गंधाडे (603.8 गुण), राजनंदिनी ज्ञानेश्‍वर काळे (597.2 गुण) यांनी यश प्राप्त केले.


तर दहा मीटर एअर पिस्तोल खेळ प्रकारात आर्यन अभिनय गायकवाड (546 गुण), स्वामिनी कैलास जेजुरकर (541 गुण), श्रावणी शंकर भगत (541 गुण), सौरभ बापूसाहेब चव्हाण (530 गुण) यांनी यश मिळवले आहे. या सर्व खेळाडूंची इंडियन टीम ट्रायल्स करिता निवड झाली आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक अलीम शेख, ऋषिकेश दरंदले, विजय जाधव, सुनिता लिपणे यांचे मार्गदर्शन लाभले.


खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, गर्जे, महानगरपालिकेचे फिलिप्स सर, कदम, डॉ. शशिकांत पाचरणे आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *