• Wed. Aug 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

शनिवारी वाडिया पार्कला रंगणार जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा

ByMirror

Dec 8, 2023

20 ते 16 वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा शनिवारी (दि.9 डिसेंबर) रोजी वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असून, हा संघ राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे रंगनाथ डागवाले, सुनील जाधव व दिनेश भालेराव यांनी केले आहे.
यामध्ये मुले-मुली 10 कि.मी., मुलांमध्ये 20 वर्ष वयोगट 8 कि.मी., 18 वर्ष वयोगट 6 कि.मी. 16 वर्ष वयोगट 2 कि.मी., मुलींमध्ये 20 वर्ष वयोगट 6 कि.मी., 18 वर्ष वयोगट 4 कि.मी., 16 वर्ष वयोगट 2 कि.मी. धावणार आहेत.


या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र व मेडल देण्यात येणार आहे. 14 वर्षा खालील ॲथलीटला सहभागी होता येणार नाही. नाव नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी 7.00 वाजता होणार आहे. व सर्व खेळाडूंनी आपले एएफआय व युआयडी नंबर काढणे आवश्‍यक असून, त्या शिवाय राज्य स्पर्धा खेळता येणार नसल्याचे म्हंटले आहे.

राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा बुलढाणा येथे 17 डिसेंबर रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क दिनेश भालेराव 9923837888 व राहुल काळे 9975320837 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *