• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शिवजयंती साजरी

ByMirror

Feb 19, 2024

शिवाजी महाराजांचे विचार व संस्काराने आदर्श राज्याची संकल्पना जगा समोर आली -संजय भैलुमे

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, माजी नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, आयटी सेल संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, महिला नगर तालुकाध्यक्ष कविता नेटके, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, विशाल कदम, विक्रम चव्हाण, निखिल सूर्यवंशी, रमेश आखाडे, मिरजगाव शहराध्यक्ष नागेश घोडके, कर्जत युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, विनोद भिंगारदिवे, अशोक भिंगारदिवे, युवराज पाखरे, बाळासाहेब नेटके, संदीप वाघमारे, महेश भोसले, सोन्याबापू सूर्यवंशी, बंटी पारधे, प्रवीण अडबल्ले, प्रशांत पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय भैलुमे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी समता व बंधुत्वाच्या मुल्यांवर स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. समाजातील अन्याय, अत्याचार, दडपशाहीचा त्यांनी बीमोड करुन, प्रजेचे हित हेच अंतिम ध्येय समजून राज्यकारभार केला. त्यांचे विचार व संस्काराने आदर्श राज्याची संकल्पना जगा समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.


अमित काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले स्वराज्य उभे केले. जात, धर्म, पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन, समता व बंधुत्व प्रस्थापित केली. परस्त्रीला माते समान वागणुक देऊन त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. त्यांचे विचार आज दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *