• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे भिंगारमध्ये सावित्रीबाई फुले जयंती व देवी शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

ByMirror

Jan 6, 2026
सामाजिक ऐक्याचा संदेश; विचार, संस्कृती आणि परंपरेचा संगम

सामाजिक ऐक्याचा संदेश; विचार, संस्कृती आणि परंपरेचा संगम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती तसेच देवी शाकंभरी पौर्णिमा उत्सव भिंगार परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक सलोखा, सांस्कृतिक परंपरा आणि महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.


भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि अन्यायाविरोधातील लढ्याला उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली. यानंतर देवी शाकंभरी पौर्णिमा उत्सवानिमित्त देवांग कोष्टी समाज (भिंगार) यांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य पालखी मिरवणुकीचे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी स्वागत केले. चौंडेश्‍वरी माता मंदिरात दर्शन घेण्यात आले. देवी शाकंभरी पौर्णिमा उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक एकात्मतेचा आदर्श निर्माण केला.


या कार्यक्रमास हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, संजय भिंगारदिवे, सुभाष पेंढुरकर, सुधीर कपाळे, मनोहर दरवडे, अशोक पराते, अविनाश जाधव, दीपकराव घोडके, संतोष हजारे, अशोक दळवी, अविनाश पोतदार, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, किरण फुलारी, संतोष लुनिया, इंजि. श्रीरंग देवकुळे, सुहास देवराईकर, सखाराम अळकुटे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, भूषण लंगोटे, सूर्यकांत कटोरे, अनिल हळगावकर, सुहासराव सोनवणे, तसेच देवांग कोष्टी समाज (भिंगार) अध्यक्ष शिवम भंडारी, कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्‍वर फासे, सचिव इंजि. अनिल सोळसे, खजिनदार विजयकुमार भंडारी, गजानन भंडारे, रमेश बोंदर्डे, गणेश उपरे, दीपकराव बडदे, रतन मेहेत्रे, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, अनंत सदलापुर, दिलीपशेठ गुगळे, अनिल गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, “महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षण, समता आणि माणुसकीचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार आजही तितकेच कालसुसंगत आहेत. हरदिन मॉर्निंग ग्रुप केवळ व्यायामापुरता मर्यादित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

सचिन चोपडा म्हणाले की, सामाजिक उत्सव आणि महापुरुषांच्या जयंती या केवळ साजऱ्या करण्याच्या गोष्टी नाहीत, तर त्यामागील विचार आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान आपण सर्वांनी आचरणात आणले पाहिजे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


शिवम भंडारी म्हणाले की, “देवी शाकंभरी पौर्णिमा उत्सव हा आमच्या समाजासाठी श्रद्धा आणि संस्कृतीचा महत्त्वाचा दिवस आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपसारख्या संघटनांचा सहभाग मिळाल्याने या उत्सवात अधिक रंगत आली. तर विविध समाज घटक या उत्सवाशी जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *