• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

सावित्री-ज्योती महोत्सव महिला बचत गटांसाठी ठरणार पर्वणी

ByMirror

Nov 23, 2025
सावित्री-ज्योती महोत्सव महिला बचत गटांसाठी ठरणार पर्वणी

भिंतीपत्रकाचे प्रकाशन; महिलांसह युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रात्यक्षिकासह दिले जाणार मार्गदर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला बचत गटांसाठी पर्वणी ठरणारा सावित्री-ज्योती महोत्सव यावर्षीही उत्साहात पार पडणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोट्यावधीची उलाढाल अपेक्षित असून, बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी हा महोत्सव एक महत्त्वाची बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. महोत्सवाचे भिंतीपत्रक नुकतेच अनावरण करण्यात आले.


या महोत्सवाचे हे दहावे वर्ष असून, महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. अहिल्यानगर महानगरपालिका, मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय व जय युवा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 ते 18 जानेवारी दरम्यान कोहिनूर मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय सावित्री-ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


महोत्सवाच्या नियोजन बैठकीचे आयोजन जय युवा अकॅडमीच्या टांगेगल्ली, जुने जिल्हा न्यायालय येथील कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ॲड. महेश शिंदे यांच्या हस्ते भिंतीपत्रकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी विनायक नेवसे, भाऊसाहेब पादीर, मनीषा शिंदे, प्रसाद भडके, रजनीताई ताठे, कल्याणी गाडळकर, हेमलता कांबळे, रावसाहेब काळे, जयश्री शिंदे, दिपाली उदमले, ॲड. विद्या शिंदे, अनिल साळवे, दिनेश मेढे, संतोष उल्हारे, तुषार रणनवरे, बाळासाहेब पाटोळे तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


बैठकीत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, राष्ट्रीय युवा सप्ताह, विविध स्पर्धा, बचत गटांच्या स्टॉलचे विक्री प्रदर्शन, ब्यूटी टॅलेंट शो, मोफत कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर, लोककला सादरीकरण, सर्व जातीय वधू-वर मेळावा अशा विविध उपक्रमांवर चर्चा झाली.


पुण्यातील मोगा कंपनी आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकीन तसेच केमिकलविरहीत गुळाच्या बासुंदी चहा व्यवसायासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण व प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार असल्याचे कंपनीचे संचालक मोहन गायकवाड यांनी सांगितले. बचत गटांना त्यांची उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी मांडता यावीत म्हणून स्टॉल नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


बैठकीसाठी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. सावित्री-ज्योती महोत्सव यशस्वी करण्यासाठी ॲड. अनिता दिघे, ॲड. गायत्री गुंड, ॲड. तुषार शेंडगे, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. शकील पठाण, ॲड. प्रणाली चव्हाण, ॲड. गौरी सामलेटी, ॲड. पोपटराव बनकर, ॲड. आरती शिंदे, ॲड. प्रशांत साळुंके, डॉ. इसाभाई शेख, सुनिल मतकर, मेजर भिमराव उल्हारे, शाहीर वसंत डबाळे, शाहीर कान्हू सुंबे आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *