• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस यांनी केला जालिंदर बोरुडे यांचा सत्कार

ByMirror

Mar 19, 2024

नेत्रदानची चळवळीच्या जागृतीसाठी तीन पुस्तकांची निर्मिती केल्याचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांमध्ये नेत्रदानाची चळवळ रुजविण्यासाठी नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी लिहिलेले पुस्तके व नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणून त्यांना नेत्रदानसाठी प्रोत्साहित करत असल्याबद्दल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी बोरुडे यांचा सत्कार केला. सावेडी येथे झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी सौ. सबनीस, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, प्राचार्य एस.एन. गायकवाड, प्रा गणेश भगत आदी उपस्थित होते.


नागरिकांमध्ये नेत्रदानच्या चळवळीची जागृती होण्यासाठी जालिंदर बोरुडे यांनी नेत्रज्योत, दृष्टीमित्र व अंधारातून प्रकाशाकडे हे तीन पुस्तके लिहिली आहेत. हे पुस्तके नागरिकांना ते मोफत उपलब्ध करुन देत आहे. तर त्यांनी समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकातील 3 लाख 1 हजार 111 नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणाली असून, त्याचबरोबर नेत्रदान चळवळीत ते सक्रीयपणे योगदान देत आहे. स्वखर्चाने ते सातत्याने नेत्र तपासणी शिबिर घेत आहे. तर त्यांच्या प्रयत्नाने मरणोत्तर नेत्रदान होवून अनेक दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळाली आहे. या कार्याचे सबनीस यांनी विशेष कौतुक केले.


बोरुडे यांचे गेल्या 31 वर्षापासून फिनिक्स सोशल फाऊंडेशन व इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नेत्रदान चळवळीत कार्य सुरु आहे. तर साहित्य निर्मिती करुन ते नेत्रदान, अवयवदानाची जागृती करत असल्याची माहिती ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *