• Sun. Aug 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

मुख्याध्यापिका मीना पवार यांना ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने गौरव

ByMirror

Aug 30, 2026
मुख्याध्यापिका मीना पवार यांना ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने गौरव

आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या हस्ते खांडगाव येथे सन्मान; शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या श्रीमती मीना पवार यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जन आरोग्यम, जाणीव फाउंडेशन संगमनेर, संचार निगम पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन आणि अमृत उद्योग समूह यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या हस्ते मीना पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. खांडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला.
श्रीमती मीना पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा वाबोरी येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान तर झालाच, शिवाय शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *