• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर इलाक्षी ह्युंदाईत वाहन खरेदीचा विक्रम

ByMirror

Apr 9, 2024

ह्युंदाईच्या 101 कार्सचे वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहराच्या नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरुमला आकर्षक सजावट करण्यात आली होती.


ग्राहकाचे सुहास्य वदनाने होणारे स्वागत, कर्मचाऱ्यांची विनम्र आणि तत्पर सेवा, सुमधूर संगीत, गाडी वितरणवेळी अभिनंदन गीत अशा उत्साहपूर्ण वातावरणाने शोरुमचा परिसर गजबजला होता. ह्युंदाईच्या विविध मॉडेल्सच्या सुमारे 101 कार्सचे वितरण करण्यात आले. ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल शोरुमचे संचालक विजयकुमार गडाख यांनी ग्राहकांचे आभार मानले व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या .


अनेक ग्राहकांनी मिळालेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केल. ग्राहकांना उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देण्यास इलाक्षी ह्युंदाई बांधील असल्याचा विश्‍वास जनरल मॅनेजर राजू बेजगमवर यांनी व्यक्त केला. प्रथम गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चालक सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.

ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी सेवा तसेच अतिरिक्त वॉरंटी, ह्युंदाई ॲपसह ग्राहकांना विविध सुविधांचा लाभ देण्यात आला. यावेळी सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी गाडीच्या पुढील सेवेसाठी इलाक्षी ह्युंदाई कायम कटीबद्ध राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ग्राहक, शोरूमचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *