• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

पल्स पोलिओ जनजागृतीसाठी शहरातून निघाली रॅली

ByMirror

Jun 26, 2026
पोलिओमुक्त समाजासाठी सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा -संजय गुगळे

रविवारी 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्याचे आवाहन; मनपा जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्र व जायंट्‌स ग्रुपचा उपक्रम

पोलिओमुक्त समाजासाठी सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा -संजय गुगळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका, जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्र व जायंट्‌स ग्रुप ऑफ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ जनजागृती अभियानांतर्गत भव्य रॅली काढण्यात आली. रविवारी (दि.28 जून) रोजी अहिल्यानगर सर्वत्र लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर रॅलीद्वारे बालकांना पोलिओचा डोस पाजून समाज पोलिओमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले.


या रॅलीचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, स्टेशन रोड येथून करण्यात आला. रॅलीचे उद्घाटन आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर व मातांच्या उपस्थितीत फुगे सोडून झाले. रॅली मधील विद्यार्थ्यांनी चौका-चौकात पोलिओच्या जागृतीसाठी पथनाट्य सादर केली. याप्रसंगी जायंट्‌स वेल्फेअर फाऊंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, जनआरोग्य समितीच्या सदस्या विद्या तन्वर, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अनिल गांधी, अमित मुनोत, पूजा पातुरकर, रिया पवार नुतन गुगळे, मुख्याध्यापक विजय दिघे, जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा शेख व डॉ. नितीन जगताप उपस्थित होते.


वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा शेख व डॉ. नितीन जगताप यांनी पोलिओमुक्त समाज घडविण्याबात उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवनेरी चौक व गवळीवाडा परिसरातून निघालेल्या या रॅलीत विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी “दो बूंद पोलिओ के”, “पोलिओला नाही म्हणा” असे फलक हात घेऊन जनजागृती केली.
या जनजागृती रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जायंट्‌स ग्रुपतर्फे संजय गुगळे यांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. यावेळी पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व, वेळापत्रक आणि 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना 2 थेंब पाजण्याची गरज याबत सविस्तर माहिती दिली.


संजय गुगळे म्हणाले की, पोलिओमुक्त समाजासाठी सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. “पल्स पोलिओ लसीकरण करणे आवश्‍यक असून पोलिओमुक्त अहिल्यानगर ही महानगरपालिकेची संकल्पना आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या 5 वर्षांखालील मुलांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.” या उपक्रमासाठी आरोग्य सेविका, शिक्षक व सर्व परिचारिका यांनी मोलाचे सहकार्य केले. ही रॅली यशस्वी होण्यासाठी सुवर्णा शेलार यांच्यासह परिचारिका व आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *