• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे रविवारी नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन

ByMirror

Sep 23, 2025
महिला मेळाव्याचेही आयोजन

पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांच्या हस्ते होणार कर्तृत्ववान महिलांचा गौरव


महिला मेळाव्याचेही आयोजन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नगर तालुका तालिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवरात्र उत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त रविवारी (दि.28 सप्टेंबर) नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांच्या हस्ते होणार आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथील परिवार मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता महिलांचा सन्मान सोहळा होणार आहे. यावेळी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, समाजातील विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


या कार्यक्रमात सामाजिक, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग, पर्यावरण आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *