• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात कर्नल रविंद्रन बिजॉय यांची भेट

ByMirror

Nov 19, 2024
निमगाव वाघात कर्नल रविंद्रन बिजॉय यांची भेट

शहीद जवान गोरख जाधव यांच्या स्मारकास अभिवादन

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील शहीद जवान गोरख नाना जाधव यांच्या स्मारकास एमआयसीएसचे कर्नल रविंद्रन बिजॉय यांनी भेट देऊन शहीद जवान जाधव यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी एमआयसीएसचे कर्नल राम मोहेन, कर्नल मोहंमद रफीक, डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, नगरचे गाईड अमोल बास्कर, मेजर ओबेरॉय, कर्नल एम.के. सिंग, मच्छिंद्र जाधव, सेवानिवृत्त मेजर शिवाजी पुंड आदींसह युवक-युवती उपस्थित होते.


एमआयसीएसचे कर्नल रविंद्रन बिजॉय यांच्यासह आलेल्या टिमचे निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने पै. नाना डोंगरे यांनी स्वागत केले. देश रक्षणाची कार्य करताना नक्षलवादींच्या हल्ल्यात शहीद झालेले जाधव यांच्या पराक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली.

कर्नल रविंद्रन बिजॉय यांनी गावागावात देशभक्तीने भारावलेले युवक देश सेवेसाठी सैन्यात दाखल होतात. गावातून देशभक्तीचे बीजे पेरली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी शहीद जवान गोरख जाधव अमर रहे! च्या घोषणा देण्यात आल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *