• Thu. Jan 1st, 2026

केडगावच्या सरस्वती विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Dec 10, 2025

विद्यार्थ्यांनी विविध पात्र साकारुन जीवंत केले रामायणातील प्रसंग


सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा -अनिल मोहिते

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी रामायण मधील राम, सीता, लक्ष्मण, हनुमान याचे पात्र साकारले होते. एकूण 83 विद्यार्थ्यांनी 30.05 मिनीटात आपल्या कौशल्याने भारतीय संस्कृती व परंपरेच्या वैभवाचे दर्शन घडविले.


स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष अनिल (आण्णा) संपतराव मोहिते तसेच उद्योजक विलास कटारिया, उद्योजक विनोद (पिंटूशेठ) कटारिया यांच्या हस्ते झाले. विद्या प्रतिष्ठान व डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम ढवाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आर्किटेक्ट आयुष कटारिया, ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली अंदुरे, गोकुळदास लोखंडे, डॉ.रवींद्र चोभे, प्रा.रावसाहेब पवार, अरुण कुलकर्णी, संभाजी पवार, मनोज कोतकर, प्रज्ञाताई देवेंद्र, सुलोचना ढवाण, जालिंदर कोतकर, मयूर बांगरे, अमोल येवले, योगेश सरोदे, आण्णासाहेब शिंदे, कैलास चोथे विठ्ठल भोर, श्रीपाद शिंदीकर, ओंकार सातपुते, अशोकराव पुंड, काळे सर, शाळेचे मुख्याध्यापक संदिप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी,शिक्षक, पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अनिल मोहिते म्हणाले की, डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानने नेहमीच हा प्रयत्न केला की, केडगाव सारख्या भागातल्या विद्यार्थ्यांना एक दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. मराठी माध्यमातून सेमी इंग्लिशच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेने नेहमी केला आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा. फक्त मनोरंजन पुरते कार्यक्रम मर्यादीत न ठेवता मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर कौशल्य आत्मासात होण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षणाबरोबरच इतर कला-कौशल्य आत्मसात करण्याचा संदेश त्यांनी दिला. तसेच शाळेस वेळोवेळी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.


संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर यांनी केले. गणेशवंदना व सरस्वती पूजनाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रामायणा मधील राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, वानरसेना साकारून संपूर्ण रामायणचे सादरीकरण केले. सोशल मिडीयाचे दुष्परिणाम, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्त्रीजीवन, अध्यात्म या विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विविध गितांवर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता. ऑपरेशन सिंदूरच्या देखाव्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


चिमुकल्यांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थित पालक भारावले. उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी,सुरेखा कजबे,अर्चना कुलकर्णी यांनी केले. अविनाश साठे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *