• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

अंबिका विद्यालयाच्या दिंडीने केडगाव झाले विठ्ठलमय

ByMirror

Jul 6, 2025
अंबिका विद्यालयाच्या दिंडीने केडगाव झाले विठ्ठलमय

स्त्री भ्रूणहत्या थांबवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देत निघाली दिंडी

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील अंबिका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या दिंडीने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाले होते. मोठ्या उत्साहात निघालेली बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात पार पडली. या दिंडीत श्री विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्‍वर माऊली, तुकाराम महाराज व विविध संत व वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.


महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाची परंपरा विद्यार्थ्यांना ज्ञात होण्यासाठी या दिंडे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूणहत्या थांबवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, सार्वजनिक स्वच्छतेवर सामाजिक संदेश दिला. केडगाव परिसरातून निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसर भक्तीमय बनले होते. शाहूनगर येथील नव्याने बांधलेल्या अंबिका विद्यालयाच्या प्रांगणात या दिंडीचा समारोप रिंगण सोहळ्याने झाला. यामध्ये बाल वारकरी आणि विद्यालयातील शिक्षकांनी फुगडीचा फेर धरला होता.


संत तुकाराम आणि ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या विचारांची रुजवण समाजामध्ये करण्याचे कार्य रयत शिक्षण संस्था करत आहे. या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीची ओळख करुन देण्यात आली असल्याची भावना रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी आणि विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी व्यक्त केली. यावेळी उपमुख्याध्यापक सुखदेव मुरूमकर, पर्यवेक्षक अभयकुमार चव्हाण, सिताराम जपकर, संदीप गाडीलकर, सुधिर आघाव, प्रा. शिंदे, प्राध्यापिका राधिका मते, ऋषिकेश दळवी, कांचन ससे, शितल भिंगारदिवे, प्रियंका सातपुते, अश्‍विनी कल्हापूरे, जयश्री जपकर, वर्षा चौरे, रेखा रासकर, स्वाती जाधव, कविता शेळके, शुभांगी बनकर, गायत्री गुंजाळ, अश्‍विनी कांबळे, मिनाज पठाण, कीर्ती पावसे, सुवर्णा कांबळे, अवंती कुलकर्णी, मदतनीस सविता औटी, सुवर्णा शिंदे, रेखा शेळके आदींसह शिक्षिका, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूजा गोरे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *