• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

दहिवाळ परिवाराने भाविकांना निशुल्क काशी यात्रा घडवून, घेतलेल्या भागवत कथेचा समारोप

ByMirror

Aug 20, 2023

काशीच्या धार्मित वातावरणात रंगलेल्या कीर्तन व भागवत कथेत भाविक मंत्रमुग्ध

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रावण अधिकमासच्या पार्श्‍वभूमीवर नवनाथभाऊ भगवानराव दहिवाळ (खरवंडीकर) यांच्या वतीने काशी (उत्तर प्रदेश) येथे आयोजित भागवत कथा सप्ताह मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला. या सप्ताहनिमित्त दोनशेपेक्षा जास्त भाविकांना मोफत काशीची तीर्थयात्रा घडवून या सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


संत खंडोजी बाबा आणि परमपूज्य भगवान दहिवाळ यांच्या प्रेरणेतून पार पडलेल्या या सप्ताहाची सांगता विकासानंद महाराज मिसाळ (पिंपळगाव वाघा) यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. या सप्ताहात ह.भ.प. राम महाराज खेडकर, हरी महाराज राऊत, लक्ष्मण महाराज हिंगे, जनार्धन महाराज माळवदे, रामानंद महाराज माळवदे, भगवान महाराज मचे यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. तर कल्याण महाराज डहाळे यांच्या भागवत कथेच्या भक्तीरसात श्रोते न्हाऊन निघाले. भक्ती व धार्मिक वातावरणाने प्रफुल्लित झालेल्या या सप्ताहाचा भाविकांनी लाभ घेतला.


या सप्ताहाप्रसंगी नवनाथभाऊ दहिवाळ, अरुणा दहिवाळ, जयश्री मैड, राजश्री सुवर्णकार, प्रियंका शहाणे, मंगेश शहाणे, विजय मैड, व्यंकटेश सुवर्णकार, सचिन दहिवाळ, पूजा दहिवाळ, शितल दहिवाळ, नितीन दहिवाळ, बालाजी सुवर्णकार, संतोष दहिवाळ, मंगेश डहाळे, प्रदीप फुंदे, आकाश अंबिलवादे, मधुकर मैड, रामकिसन गावडे, गावडे परिवार, प्रवीण दहिवाळ, आकाश दहिवाळ, हिंगे परिवार, संतोषी भिसे, प्रिया मत, अनिता भालसिंग, स्नेहल झेंडे, प्राजक्ता शेरे, शेखावत, शुभम टाक, आण्विक टाक, सुमित बोराडे, नारायण कर, साईराजदहिवाळ, मुडलिकआंधळे परिवार, संगीता डहाळे, संध्या सुवर्णकार, राजश्री डहाळे, देवांश दहिवाळ, देवांश दहिवाळ, शंभू दहिवाळ, ओवी दहिवाळ, स्वरा दहिवाळ, राजवी सुवर्णकार, रिशिका सुवर्णकार, संदीप फुंदे, विशाल फुंदे, अनिल फुंदे,डॉ.सौ. ढेरे, संगीता श्रीमाळी, सुजाता उदावंत आदींसह शहरासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून भाविक उपस्थित होते.


दहिवाळ परिवाराने या सप्ताहासाठी दोनशेपेक्षा अधिक भाविकांची जाण्याची-येण्याची व त्यांच्या खाण्यासह निवासाची सोय केली होती. सप्ताहात दररोज अन्नदान करण्यात आले. दरवर्षी दहिवाळ परिवाराच्या वतीने त्यांच्या मुळगावी भगवानगडाच्या पायथ्याची खरवंडी येथे सप्ताह केला जातो. या वर्षी अधिक मासचे औचित्य साधून काशी येथे सप्ताह राबवून भाविकांना तीर्थयात्रा देखील घडविण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *