गरजूंना आधार देण्याचे इंगळे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी -सचिन रणशेवरे
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक भावनेने इंगळे प्रतिष्ठानचे कार्य सुरु आहे. विविध धार्मिक सण-उत्सवात विविध उपक्रम राबवून आपली संस्कृती जोपासण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जात आहे. इतर धर्मियांच्या सण-उत्सवात सहभागी होवून प्रतिष्ठानच्या माध्यमातून धार्मिक ऐक्याचे दर्शन देखील घडत आहे. विविध सामाजिक उपक्रमातून गरजूंना आधार देण्याचे इंगळे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी केले.
शहरात सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंगळे प्रतिष्ठानच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे व अशोकभाऊ इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे, संजय इंगळे, पप्पू पाटील, राजेंद्र इंगळे, किशोर सोनवणे, कृष्णा इंगळे, राहुल बत्तीन, निलेश खंडेलवाल, सचिन चव्हाण, सुनील भोसले, निखिल उगले, सादिक शेख, अक्षय रसाळ, मतीन शेख, संतोष आडागळे, निखिल कोल्हे, प्रवीण कांबळे, गणेश शिंपी, तेजस भिंगारे, आकाश सरोदे, जय इंगळे, प्रथमेश दुस्सा आदींसह इंगळे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे म्हणाले की, दरवर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिनदर्शिका छापून त्याचे मोफत घरोघरी, दुकाने व कार्यालयात वाटप केले जाते. प्रतिष्ठानचे सुरु असलेले सामाजिक कार्याची माहिती व छायाचित्र देखील या दिनदर्शिकेत प्रकाशित करण्यात आलेले आहे. सामाजिक कार्यातून सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती या प्रतिष्ठानशी जोडला गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.