• Wed. Aug 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

ByMirror

Aug 18, 2026
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून दिला राष्ट्रप्रेम व एकात्मतेचा संदेश

विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून दिला राष्ट्रप्रेम व एकात्मतेचा संदेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल, अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेज तसेच एम्स इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मिसगर लायब्ररी परिसरात आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सईद सोलापुरे आणि सोहेल हनीफ उपस्थित होते. तसेच नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचे विश्‍वस्त वाजिद जावेद खान व इफ्तिखार अकील अहमद खान यांची विशेष उपस्थिती लाभली.
ध्वजारोहणानंतर प्रमुख पाहुणे प्रा. सईद सोलापुरे यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन देशाबद्दल प्रेम, जबाबदारी आणि कर्तव्याची भावना मनात जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी विद्यार्थ्यांनी उर्दू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या विविध भाषांमध्ये देशभक्तीपर भाषणे, कविता व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीने भारावले होते. याप्रसंगी अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका खान रुमाना, अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य खान मुनव्वर हुसेन सर तसेच एम्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका खान साबा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तिन्ही शैक्षणिक संस्थांतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *