महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रवृत्तीचे दहण
महिलांना देवीच्या रुपाने पुजण्याचा प्रत्येकाने संकल्प करावा -अतुल फलके
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे एकता फाऊंडेशनच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर करुन होळी पेटविण्यात आली. महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रवृत्तीचे दहण करण्यात आले. गावातील महिलांना होळी पेटविण्याचा मान देऊन मोठ्या उत्साहात विधीवत पूजेने होळी सण साजरा करण्यात आला.
रंजना दुश्मन, मंगल फलके, द्वारकाबाई येणारे, अनिता शिंदे, रूपाली फलके, शैला फलके, मंदा पाचरणे या महिलांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच किरण जाधव, एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोसायटी सदस्य अतुल फलके, अरुण अंधारे, अजित फलके, विजय गायकवाड, बाबा काळे, गौरव काळे, रामदास फळके, उपेंद्र घाटविसावे, अंतवन गायकवाड आदी उपस्थित होते.
उपसरपंच किरण जाधव म्हणाले की, महिला या समाजाचा व कुटुंबाचा कणा आहे. त्यांचा सन्मान करुन एकता फाऊंडेशनने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. अतुल फलके यांनी या होळीत महिलांवर होणारे अत्याचार प्रवृत्तीची होळी करुन महिलांना देवीच्या रुपाने पुजण्याचा प्रत्येकाने संकल्प करण्याचे आवाहन केले.