• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

राधाकृष्ण मंदिर सर्जेपुरा येथे मंगळवारी हनुमान चालीसा व भजन संध्येचे आयोजन

ByMirror

Apr 15, 2024

भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरच्या (ट्रस्ट) वतीने मंगळवारी (दि.16 एप्रिल) हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून हा धार्मिक सोहळा रंगणार असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्‍वस्तांनी केले आहे.


रात्री 8 वाजता या कार्यक्रमाचे प्रारंभ होणार आहे. या धार्मिक सोहळ्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान श्रीरामच्या आरतीने या सोहळ्याचा समारोप होणार असून, भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन राधाकृष्ण मंदिरच्या वतीने करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *