• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

केमिस्ट भवनला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

ByMirror

Apr 23, 2026
केमिस्ट भवनला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

आरोग्य व्यवस्थेत केमिस्ट बांधवांचे मोठे योगदान -राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बुरुडगाव रोड येथे उभारण्यात आलेल्या नूतन केमिस्ट भवनाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी भवनाच्या उभारणीबद्दल समाधान व्यक्त करत केमिस्ट बांधवांचे कौतुक केले.
विखे पाटील म्हणाले की, केमिस्ट बांधव केवळ औषध व्यवसायापुरते मर्यादित न राहता समाजकार्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेत त्यांचे योगदान मोठे असून, या माध्यमातून ते समाजाशी जोडलेले आहेत. शहरात अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेले केमिस्ट भवन आज साकार झाले असून, ही बाब अत्यंत समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.


या नूतन भवनामुळे केमिस्ट बांधवांना एकत्र येण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भविष्यात हे भवन संवाद, नियोजन आणि प्रशिक्षणासाठी केंद्रबिंदू ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करत भवनाच्या उभारणीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या भवनामुळे संघटनेच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून, केमिस्ट बांधवांमधील समन्वय आणि एकजूट अधिक दृढ होणार आहे. विविध सामाजिक व व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळणार असून, केमिस्ट बांधवांच्या प्रगतीसाठी हे भवन महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक निखील वारे, पै. महेश लोंढे, शहर उपाध्यक्ष भरत सुपेकर, शहर सचिव मनिष सोमाणी, शहर खजिनदार मनोज खेडकर, शहर सहसचिव मनिषा महेश आठरे, माजी अध्यक्ष संजय गुगळे,संचालक नितीन सातपुते, सागर फुलसौंदर,अनिल क्षीरसागर,कमलेश गुंदेचा, युवराज खेडकर यांच्यासह संकेत गुरव, युवराज गुंजाळ, अमोल घोरपडे आदींसह केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *