• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे हुंडेकरी परिवाराच्या वतीने स्वागत

ByMirror

Apr 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे हुंडेकरी परिवाराच्या वतीने स्वागत

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते हाजी करीमशेठ हुंडेकरी यांचा सत्कार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026’ चे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. या यात्रेचे हुंडेकरी परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यात्रेसाठी आवश्‍यक असलेली जागा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या हुंडेकरी परिवाराने पुन्हा एकदा आपली सेवाभावी परंपरा अधोरेखित केली. यात्रेच्या सोयीसाठी ‘हुंडेकरी लॉन’ उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते हाजी करीमशेठ हुंडेकरी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमहापौर धनंजय जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हुंडेकरी परिवाराच्या वतीने दरवर्षी नाशिकहून सायकलवरून येणाऱ्या आषाढी वारी यात्रेचेही स्वागत करुन संपूर्ण व्यवस्था पाहिली जाते. या जलयात्रेच्या निमित्ताने शहरात धार्मिक एकात्मता आणि सामाजिक सहकार्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.


डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “‘गोदा ते नर्मदा’ ही जलयात्रा शहरांच्या जलसमृध्दीसाठी महत्त्वाचे पाऊल आहे. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही यात्रा आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण समाजासाठी कार्य करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हुंडेकरी परिवाराने यात्रेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.


हाजी करीमशेठ हुंडेकरी म्हणाले की, “आमच्या परिवाराला सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळते, हे आमचे भाग्य आहे. यात्रेकरूंना सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी समजून आम्ही काम करतो. आषाढी वारी असो किंवा जलयात्रा प्रत्येक उपक्रमात आम्ही भाविकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. पुढेही अशी सेवा सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *