• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरमध्ये शनिवारी निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

ByMirror

Mar 15, 2026

तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाचा उपक्रम


समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने शहरात निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील युवक-युवतींना योग्य जोडीदार मिळावा आणि विवाह प्रक्रियेला सुलभता यावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कांबळे व वधू-वर समिती प्रमुख अशोक बागुल यांनी केले आहे.


हा वधू-वर परिचय मेळावा शनिवार, दि. 14 मार्च रोजी न्यू टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी उद्घाटन सत्रानंतर वधू-वर परिचय मेळाव्याला प्रारंभ होणार असून त्यामध्ये सहभागी युवक-युवतींना एकमेकांची ओळख करून देण्यात येणार आहे.


या मेळाव्यात बौद्ध समाजातील अविवाहित युवक-युवतींसह घटस्फोटीत तसेच विधुर व्यक्तींचीही नोंदणी केली जाणार आहे. विवाहासाठी इच्छुक असलेल्या कुटुंबांना एकाच ठिकाणी एकमेकांची माहिती मिळावी आणि संवाद साधता यावा, यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


सहभागी होणाऱ्या युवक-युवतींच्या पालकांनी आपल्या मुला-मुलींचा बायोडाटा व फोटो सोबत घेऊन उपस्थित राहावे, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच मेळाव्याबाबत अधिक माहिती किंवा नोंदणीसाठी संजय कांबळे (मो. 9970775522) व अशोक बागुल (मो. 9881827892) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *