• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात वृक्षरोपणाने पर्यावरण दिवस साजरा

ByMirror

Jun 6, 2025
वृक्ष संवर्धनाचा ग्रामस्थांचा संकल्प

वृक्ष संवर्धनाचा ग्रामस्थांचा संकल्प


वृक्ष जगले तर सजीव सृष्टी वाचणार -पै. नाना डोंगरे

नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिवस वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला.
संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, चंद्रकांत जाधव, डॉ. विजय जाधव, बाबूराव जाधव, बबन जाधव, विशाल निमसे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, संजय जाधव, डॉ. संदीप जाधव, लक्ष्मण चौरे, सुरेश जाधव, जयंत जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरण हा जागतिक प्रश्‍न बनला असून, वृक्षारोपणाशिवाय पर्याय राहिला नाही. वृक्ष जगले तर सजीव सृष्टी वाचणार असल्याने, प्रत्येकाने वृक्षरोपण करणे काळाची गरज बनली असल्याचे सांगितले. काही क्षणिक सुखांसाठी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आपल्या पुढील वंशाचे अस्तित्व वृक्षरोपण व संवर्धनावर अवलंबून आहे. पर्यावरणाचे समतोल बिघडल्याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


उपस्थित ग्रामस्थांनी लावलेली झाडे जगविण्यासाठी वृक्षसंवर्धनाचा संकल्प घेतला. या उपक्रमासाठी मेरा युवा भारत अहिल्यानगरचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरांगे व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय विभागाचे संचालक अशोक गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *