• Thu. Apr 16th, 2026

भिंगारमध्ये आरपीआयच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

ByMirror

Apr 15, 2026

पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा गौरव


बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे न्याय आणि समतेच्या तत्वांवर कायम -पोलिस उपाधीक्षक दिलीप टिपरसे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने भिंगार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यांच्या महान कार्याचा जागर करण्यात आला.


शहर पोलिस उपाधीक्षक दिलीप टिपरसे, भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगिर तसेच आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट सुनिल काळे, रिपाई भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, भिंगार अर्बन बँकेचे संचालक एकनाथ जाधव, भाजप शहर जिल्हा चिटणीस महेश नामदे, भाजप भिंगार शहराध्यक्ष सचिन जाधव, नगरसेवक रवी लालबोंद्रे, माजी सरपंच युवराज पाखरे, माजी उपसरपंच कैलास पगारे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मनोनित सदस्य वसंत राठोड, रिपाई नेते चंद्रकांत ठोंबे, रिपाई नेते विलास साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मा व्हा प्रेसिडेंट संभाजी भिंगारदिवे, भाऊ भिंगारदिवे, मच्छिंद्र भिंगारदिवे, जनाभाऊ भिंगारदिवे, संतोष छजलाने, प्रकाश गोहेर, किशोर भगवाने, विक्रम चौहान, अशोक जाधव, भिमराव पगारे सर, जयंत गायकवाड सर, अजय पाखरे, प्रमोद जाधव, काँग्रेसचे शामराव वागस्कर, भाजपचे शिवाजी दहीहंडे, प्रकाश लूनिया तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमात पोलिस दलात उत्कृष्ट कार्य करून गुन्हेगारी रोखण्यात मोलाची भूमिका बजावणारे पोलिस उपाधीक्षक दिलीप टिपरसे व सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगिर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच आंबेडकरी चळवळीत सातत्याने योगदान देणारे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचाही गौरव करण्यात आला.


अशोक गायकवाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांमुळे समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळाला. त्यांचे कार्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. आजच्या तरुण पिढीने शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करून समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


अमित काळे म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. भीम जयंतीसारख्या कार्यक्रमांमुळे समाजात एकजूट निर्माण होते आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिलीप टिपरसे व जगदीश मुलगिर सत्काराला उत्तर देताना सांगितले की, पोलिस दलाचे कर्तव्य म्हणजे समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहणे. बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे न्याय आणि समतेच्या तत्वांवर काम करत आम्ही आमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत राहणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *