निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी सीआरएस नोंदणी करण्याचे खेळाडूंना आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटातील फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीला भुईकोट किल्ला मैदान येथे प्रारंभ झाले आहे.

या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी फुटबॉल संघ व खेळाडूंना सीआरएस नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, सहसचिव प्रदीप जाधव व विक्टर जोसेफ यांनी केले आहे.
29 जानेवारी पासून नागपूर येथे राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटातील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ पाठवण्यासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने निवड चाचणीला प्रारंभ करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, सीआरएस नोंदणी न केलेल्या खेळाडूंना निवड चाचणीत खेळता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून जिल्ह्याचा संघ जाहीर केला जाणार असून, तो नागपूरच्या राज्यस्तरीय स्पर्धेत अहमदनगरचे प्रतिनिधित्व करणार आहे.