• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

अशोक पालवे याने कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पटकाविले रौप्य पदक

ByMirror

Jan 23, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- 44 व्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पै. अशोक भिमा पालवे याने उत्कृष्ट खेळ करुन 92 किलो वजन गटात (गादी विभाग) रौप्य पदक पटकाविले.


नुकतीच ही स्पर्धा रत्नागिरी येथे उत्साहात पार पडली. यामध्ये राज्यातील मल्ल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालवे हा श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव महाविद्यालयाचा खेळाडू असून, तो यशवंत कुस्ती संकुल गोपाळवाडी (ता. दौंड, जि. पुणे) येथे पै. सुरेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

या यशाबद्दल त्याचे अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, नगर तालुका तालिम सेवा संघाचे सचिव पै. बाळू भापकर यांनी त्याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *