• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; सरस्वती मंदिर नाईट स्कूलचा गुरुपौर्णिमेचा उपक्रम

ByMirror

Jul 11, 2025
नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांची गुरुवंदना

नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांची गुरुवंदना

नगर (प्रतिनिधी)- शहरातील सरस्वती मंदिर नाईट स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसा कामे करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेतील गुरुंना वंदन केले.


आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा मेघा डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी तीक डहाळे, मुख्याध्यापक पांडुरंग गवळी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष स्वप्नील वाघ, विलास शिंदे, मासूम संस्थेचे प्रतिनिधि महेंद्र म्हसे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेघा डहाळे म्हणाल्या की, शिक्षणातून जीवनाचे स्वप्न साकारले जाणार आहे. कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून लांब गेलेले विद्यार्थी पुन्हा शिक्षणाकडे वळाल्याचे पाहून त्यांचा अभिमान वाटतो. तर रात्री त्यांच्या अत्यंत पोटतिडकीने शिकविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचे योगदान देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रास्ताविकात मुख्याध्यापक पांडुरंग गवळी यांनी गुरुशिवाय जीवन अपूर्ण असल्याचे सांगून, जीवनात गुरुचे महत्त्व विशद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. डहाळे परिवाराच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा कुऱ्हाडे यांनी केले. आभार देवका लबडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नव विद्या प्रसारक मंडळाचे सह सचिव निलेश वैकर व सर्व कार्यकारी मंडळाचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *