रविदास महाराजांना अभिवादन करुन आरती
संत रविदासांचे विचार आजही अन्यायाविरुध्द बंड करण्याची प्रेरणा देतात -संजय खामकर
नगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने संत गुरू रविदास महाराज यांची 648 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संघटनेच्या मुख्य कार्यालयात संत रविदास महाराजांच्या मुर्तीचे विधिवत पूजन करुन आरती करण्यात आली. रविदास महाराजांच्या जय घोषाणे संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
अभिवान कार्यक्रमाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, रुपेश लोखंडे, अरुण गाडेकर , संदिप सोनवणे, मनिष कांबळे, किरण सोनवणे, संतोष कांबळे, स्वप्निल खामकर, दिलीप कांबळे, बाळासाहेब कदम, भानुदास ननावरे, मच्छिंद्र हिरे, दिलीप तावरे, किसन बागडे, महेश काजळकर, शंकर शेवाळे, वसंत देशमुख, नानासाहेब शिंदे, ज्ञानदेव पाखरे, अर्जुन कांबळे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
संजय खामकर म्हणाले की, चौदाव्या शतकात कर्मकांड, अंधश्रध्दा, अज्ञान, भिती व गुलामगिरीत जोखडलेल्या समाजाला संत गुरु रविदास महाराजांनी प्रकाश वाट दाखवली. निर्भीडपणे समता व मानवतेचा संदेश देऊन, ही क्रांतीकारी चळवळ अतिशय आत्मविश्वासाने रविदास महाराजानी चालविली. त्यांचे विचार आजही अन्यायाविरुध्द बंड करण्याची प्रेरणा देतात. त्यांनी माणसामधील द्वेष व भेदभाव नष्ट करण्याचे काम केले. समता व बंधूभावाची बीजे त्यांनी रोवली. आपली प्रत्येक कृती संत रविदास महाराजांच्या विचारांप्रमाणे असावी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आणि सन्मान देणारी असावी, असे त्यांनी सांगितले.