शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी
रविदास महाराजांच्या विचाराने जगला समतेचा संदेश मिळाला -शिवाजी साळवे
नगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने शहरात संत रविदास महाराजांची 648 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. समितीच्या दिल्लीगेट बागरोजा हडको येथील कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनाताई गायकवाड, शहराध्यक्ष शशिकलाताई झरेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, युवक अध्यक्ष अभिजीत खरात, वधू वर मंडळाचे केंद्रप्रमुख बापूसाहेब देवरे, नंदकुमार गायकवाड, पोपटराव बोरुडे, संतोष त्रिंबके, लक्ष्मण साळे, किरण गांगर्डे, सोमनाथ केदारे, संगीता साळवे, दीपक पाचरणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
शिवाजी साळवे यांनी आपल्या सांगितले की, संत रविदास महाराजांमुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. त्यांच्या शिकवणीतून समाजाला अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांपासून मुक्त होण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या विचारांनी जगला समतेचा संदेश मिळाला. त्यांचे विचार सर्व समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रविदास महाराजांच्या जयंती दिनी राज्य सरकारने शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.