• Mon. Jul 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

चारचाकी वाहन खरेदीने कुटुंबीयांचे सिमोल्लंघन

ByMirror

Oct 13, 2024
चारचाकी वाहन खरेदीने कुटुंबीयांचे सिमोल्लंघन

ग्रामीण भागातून चारचाकी वाहनांना मागणी

वासन टोयोटात कार खेरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

नगर (प्रतिनिधी)- विजया दशमीच्या (दसरा) मुहूर्ताने शहरात चारचाकी वाहन खरेदीने सिमोल्लंघन झाले. चारचाकी वाहन खरेदीला चांगलीच गर्दी दिसून आली. अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.


सनई-चौघड्यांच्या सुरात ग्राहकांचे शोरुममध्ये स्वागत करण्यात आले. दिवसभरात तब्बल 32 कारचे वितरण करण्यात आले. टोयोटाच्या ग्लांझा, टायसर व हायराईडर या वाहनांना अधिक मागणी आहे. गाडीची विधीवत पूजा करुन, दिवसभर वाहन वितरणाचा कार्यक्रम सुरु होता. राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते नवीन चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले.


कार उत्पादन क्षेत्रात जगातील टॉप ब्रॅण्ड असलेल्या टोयोटा कंपनीत प्रवाश्‍यांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देऊन कारची निर्मिती करण्यात येते. क्वॉलिटी, ड्युरॅब्लिटी, रिलॅब्लिटी (क्युडीआर) या संकल्पनेवर आधारित निर्मिती केलेल्या व आकर्षक लूक, दणकटपणा व योग्य किंमत असलेल्या टोयॅटोच्या वाहनांकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. तसेच सुसज्ज शोरुम, वर्कशॉपच्या माध्यमातून तत्पर सेवा, कुशल कामगार वर्ग यामुळे ग्राहक टोयोटाला पसंती देत आहे. आपल्या कुटुंबात एक तरी चारचाकी वाहन असावे, या भावनेने ग्राहकांचा चारचाकी घेण्याचा कल अधिक असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.



चांगल्या प्रमाणात झालेला पाऊसामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून चारचाकी वाहनांना मागणी वाढली आहे. डिझेलपेक्षा पेट्रोल वाहनांना अधिक मागणी आहे. तर एसयूव्ही सारख्या लहान चारचाकी वाहनांना ग्राहक पसंती देत आहे. बाजारपेठेत उत्साहपूर्ण वातावरण आहे. -जनक आहुजा (संचालक, वासन टोयोटा)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *