• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनल विधीज्ञांची नियुक्ती

ByMirror

Apr 7, 2026
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनल विधीज्ञांची नियुक्ती

ॲड. महेश शिंदे, ॲड. सुरेश लगड, ॲड. शिवाजी कराळे व ॲड. अनिता दिघे यांचा समावेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा व सत्र न्यायालयातंर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनल विधीज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्यायाधीश शिवाजीराव कचरे व सचिव योगेश पैठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


या पॅनलमध्ये ॲड. महेश शिंदे, ॲड. सुरेश लगड, ॲड. शिवाजी कराळे व ॲड. अनिता दिघे यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व वकिलांच्या सामाजिक व वकीली व्यवसायाच्या कामाची दखल घेऊन त्यांची नियुक्ती झाली आहे.
ॲड. महेश शिंदे गेल्या पंधरा वर्षांपासून कौटुंबिक न्यायालय, धर्मदाय उपायुक्त कार्यालय येथे वकिली व्यवसाय करीत असून, जय युवा अकॅडमीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, बेटी बचाव बेटी पढाव, मोफत आरोग्य शिबिर व स्वच्छता अभियान यासह शासनाचे विविध प्रकल्पात आणि सामाजिक कार्यात जिल्हाभरात कार्य करत आहे.


ॲड. सुरेश लगड हे विशेष सरकारी वकील असून, अनेक वर्षापासून वकिली व्यवसायाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांना व नवोदित वकिलांना मार्गदर्शन, युवकांचे विविध उपक्रम सातत्याने राबवित असतात. अहमदनगर बार असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष आहेत. त्यांची फेरनिवड झाली आहे.
ॲड. शिवाजी कराळे हे मागील 25 वर्षापासून वकीली व्यवसाय करत आहे. ते देखील सामाजिक कार्याशी जोडलेले असून, विविध सामाजिक कार्यात त्यांचे योगदान असते. अहमदनगर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, कौटुंबिक न्यायालयाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.


ॲड. अनिता दिघे अहमदनगर बार असोसिएशनच्या माजी सचिव असून, आधारवड बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिला व युवतींसाठी विविध उपक्रम राबवित आहेत.
या वकिलांच्या नियुक्तीबद्दल अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे, उपाध्यक्ष ॲड. भाऊसाहेब घुले, जिल्हा सरकारी वकील ॲड सतीश पाटील, ॲड. लक्ष्मण कचरे, ॲड. भुषण बऱ्हाटे, ॲड. दिलीपराजे शिंदे, ॲड. शकील पठाण, डॉ.प्रा. रमेश वाघमारे, ॲड. तुषार शेंडगे, ॲड. गायत्री गुंड, ॲड. पोपट बनकर, रजनी ताठे, ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. मनीषा भिंगारदिवे, ॲड. विद्या शिंदे, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. प्रशांत साळुंके, ॲड. सुनील तोडकर, ॲड. संतोष शिंदे, ॲड. नाझमीन बागवान, ॲड. उमेश गट, ॲड. धनंजय जाधव, ॲड. आरती शिंदे, ॲड. शिवाजी सांगळे आदींनी अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *