• Mon. Jul 21st, 2025

अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनची नुतन कार्यकारणी जाहीर

ByMirror

Dec 11, 2023

नरेंद्र फिरोदिया यांची अध्यक्षपदी फेरनिवड; वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शहरात पार पडली. या बैठकीत सर्वांच्या संमतीने नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तर नरेंद्र फिरोदिया यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली.


हॉटेल आयरीस प्रीमीयर येथे झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभे पुढे ठेण्यात आलेले विषय सर्व संमतीने मंजूर करण्यात आले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभे पुढे नवीन कार्यकारिणी निवड हा प्रमुख विषय होता. पदाधिकारी यांची निवड चुरशीची न होता एकमताने निवडण्यात आली.


अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनची नवीन जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे:- अध्यक्ष- नरेंद्र फिरोदीया, उपाध्यक्ष- मनोज वाळवेकर, खालिद सय्यद, जोगासिंग मिनहास, अमरजितसिंग साही, मानद सचिव- रोनप (रॉनी) फर्नांडीस, सहसचिव- व्हिक्टर जोसेफ, प्रदीपकुमार जाधव, गोपीचंद परदेशी, मानद खजिनदार- रिशपालसिंग परमार, उपखजिनदार- रणबीरसिंग परमार, कार्यकारिणी सदस्य- पल्लवी सैंदाणे, रमेश परदेशी, सादीक (रहीम) सय्यद, राजू पाटोळे, जोएब खान, जेव्हिअर स्वामी, अरविंद कुडीया, सॅवियो वेगास, गोपाल मनी.


या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड अध्यक्ष नरेंद्र फिरोदीया यांनी जाहीर करुन सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सभेसाठी उपस्थित असलेले संस्थेचे सिए गुर्जर यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित मानद सचिव रोनप फर्नांडीस व अध्यक्ष नरेंद्र फिरोदीया यांनी संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम व फुटबॉल स्पर्धेबद्दल असोसिएशनची असणारी भूमिका स्पष्ट केली. प्रदीपकुमार जाधव यांनी सूत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *