खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये करणार महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व
नगर (प्रतिनिधी)- दीव-दमण येथे 19 मे पासून सुरु होणाऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2025 स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र बीच फुटबॉल संघात अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचा खेळाडू ओम साहेबराव दंडवते याची निवड झाली आहे.
अलिबाग (जि. रायगड) येथे 7 ते 9 मे दरम्यान पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य बीच फुटबॉल निवड चाचणीमधून खेलो इंडिया स्पर्धेसाठी 12 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर मुंबई येथे 13 तारखेपासून सुरु झाले असून, ते 18 मे पर्यंत चालणार आहे.
ओम दंडवते याने अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेद्वारे आयोजित केलेल्या जिल्हा फुटबॉल लीगमध्ये कराळे क्लब हाऊस संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच वरिष्ठ राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्हा संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. दंडवते याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, अमरजितसिंग शाही, जोगासिंग मिन्हास, सचिव रोनप फर्नांडिस, सह-सचिव प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ, राजू पाटोळे, खजिनदार रिशपालसिंग परमार व इतर सर्व सभासदांनी अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.