• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

पिंपळगाव रोठा येथे कोरठण खंडोबा देवस्थानात आरती व स्वच्छता अभियान

ByMirror

Mar 21, 2026
सामाजिक बांधिलकी जपत भाविकांचा सहभाग

सामाजिक बांधिलकी जपत भाविकांचा सहभाग


स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येकाचे कर्तव्य -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील प्रसिद्ध स्वयंभू कोरठण खंडोबा देवस्थानात सामाजिक कार्यकर्ते पैलवान नाना डोफ्लगरे व भाऊसाहेब ठाणगे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी मंदिर परिसरात झालेल्या धार्मिक सोहळ्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


आरतीनंतर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये उपस्थितांनी सक्रिय सहभाग घेत परिसर स्वच्छ करून समाजासमोर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला सोन्या बापू घुले, मंदिराचे पुजारी देवीदास क्षीरसागर तसेच गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता हीच खरी सेवा या भावनेतून आयोजित या उपक्रमातून नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, “खंडोबा देवस्थान हे आपल्या श्रद्धेचे केंद्र आहे. येथे येताना आपण केवळ पूजा-अर्चा करून थांबू नये, तर आपल्या आसपासचा परिसरही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. सर्वांनी मिळून स्वच्छता अभियान राबवले, स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. देवस्थान स्वच्छ असेल, तर आपले मनही प्रसन्न राहते आणि श्रद्धा अधिक प्रसन्नतेने करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.


आपल्या पुढील पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले पाहिजेत. धार्मिक भावना आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडवणे ही काळाची गरज असल्याचेही डोंगरे यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *