• Fri. Sep 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरमध्ये रविवारी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव सोहळ्याचे आयोजन

ByMirror

Sep 4, 2026
अहिल्यानगरमध्ये रविवारी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव सोहळ्याचे आयोजन

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचा होणार गौरव; आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पुरस्काराने होणार सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ अहिल्यानगर, रविदासिया फाउंडेशन मुंबई व लोकनेते मा. आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील चर्मकार समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत, आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी (दि. 6 सप्टेंबर) आयोजित करण्यात आला आहे. या गुणगौरव सोहळ्यात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.


आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास आमदार काशिनाथ दाते, संदीपदादा घनदाट, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, तुकाराम शेंडे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रा. सुभाष चिंधे, सुभाष मराठे, ज्ञानदेव पांडुळे, नगरसेवक सुरेश बनसोडे, डॉ. सागर बोरुडे, सुनिल त्र्यंबके, मयुर बांगरे आदी उपस्थित राहणार आहेत. या गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील चर्मकार समाज एकवटणार आहे.
सकाळी 10 वाजता शहरातील टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे हा सोहळा होणार असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन गुणगौरव समितीचे संतोष कानडे, सुरेश शेवाळे, सुभाष सोनवणे, अरुण गाडेकर, विनोद कांबळे व रुपेश लोखंडे यांनी केले आहे.


गुणगौरव सोहळ्याचे हे पंधरावे वर्ष आहे. या कार्यक्रमात इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, पदवीधर, अभियंते, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, एमपीएससी-यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे युवक-युवती तसेच आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी व समाजबांधवांनी आपले मार्कशीट, जातीचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो तसेच संबंधित कागदपत्रे दोन दिवसांत तालुका प्रतिनिधीकडे जमा करावे. गुणगौरव सोहळ्यात समाजबांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून गुणवंतांचा सन्मान सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संतोष कानडे 9763922027, अरुण गाडेकर 9422335735 व दिलीप कांबळे 7373454690 यांच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *