हजारो भाविकांच्या सहभागाने बोल्हेगावातून होणार प्रस्थान; 12 व 13 सप्टेंबरला हरेगाव येथे यात्रा उत्साहात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सालाबादप्रमाणे यंदाही मतमाऊली हरेगाव यात्रेनिमित्त अहिल्यानगर शहरातून मोठ्या संख्येने भाविक पदयात्रेने हरेगाव (ता. श्रीरामपूर) येथे जाणार आहेत. गुरुवार, दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता बोल्हेगाव येथून या भव्य पदयात्रेचे प्रस्थान होणार असून, शुक्रवार दि. 11 सप्टेंबर रोजी राहुरी येथून श्रीरामपूरच्या दिशेने पदयात्रा पुढे मार्गस्थ होणार आहे. शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी हरेगाव वेस ते चर्च अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. 12 व 13 सप्टेंबर रोजी मतमाऊली यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असल्याची माहिती पद यात्रेचे प्रमुख प्रा. पंकज लोखंडे यांनी दिली.
ख्रिस्ती धर्मगुरू येशू संधिय, डायसेस, रेव्ह. आबा वाघमारे, रेव्ह. प्रकाश राऊत, रेव्ह. संपत भोसले यांच्या आशीर्वादाने मतमाऊली पदयात्रा कमिटीच्या वतीने या यात्रेला प्रारंभ होणार आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेत अहिल्यानगर शहरासह परिसरातील मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाजबांधवांसह इतर समाजबांधव देखील सहभागी होणार आहे. ही पदयात्रा आमदार संग्राम जगताप, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नगरसेवक सुरेश बनसोडे, माजी पोलिस निरिक्षक सुहासकुमार देठे, पा. प्रशांत चक्रनारायण, पा. अनिल कसबे, कार्यवाहक अभिमन्यु साळवे व राजेश फुलपगार, यात्रा कमिटीचे अध्यक्ष जॉन्सन लोखंडे, उपाध्यक्ष विशाल गायकवाड, सचिव राजू डोईफोडे, सहसचिव बाळासाहेब पाटोळे, कार्याध्यक्ष अमित लोखंडे, सहकार्याध्यक्ष निलेश साळवे, संघटक सनी भाकरे, सदस्य शरद वाकडे, अनिल डोईफोडे, जुबेर सय्यद, महादेव माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. पदयात्रेचे संपूर्ण नियोजन प्रा. पंकज लोखंडे पाहत आहेत.
पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी नितिन साठे, सूदाम साळवे, मयूर साळवे, निलेश चक्रनारायण, प्रफुल्ल लोखंडे, प्रेशित चक्रनारायण, गौरव वाकडे, जॉकीन गायकवाड, राजेंद्र भोसले, दिलशाद अन्सारी, मंगेश घोडेकर, संतोष वाघ, जावेद सय्यद, शुभम डोईफोडे, तैमूर सय्यद आदी परिश्रम घेत आहेत.
महिला कमिटीच्या माध्यमातूनही पदयात्रेच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. महिला कमिटीच्या अध्यक्ष सौ. प्राजक्ता लोखंडे, सचिव कविता डोईफोडे, उपाध्यक्ष रिटा घोडेकर, क्लेरा लोखंडे तसेच पा. लता कसबे, प्रियंका साळवे, जयश्री गायकवाड, ज्योती साठे, अनिता लोखंडे, पूजा डोईफोडे, प्रांजली लोखंडे, शुभांगी डोईफोडे, शारदा गायकवाड, मनीषा चक्रनारायण, सारिका शिरसाठ, ईश्वरी चक्रनारायण, सारा गायकवाड, पुजा लोखंडे, सान्वी लोखंडे, साईश घोडेकर, निलोफर सय्यद, मुस्तफा सय्यद, आयान सय्यद आदी नियोजनात सक्रिय आहेत. स्व मधूकर खंडूजी लोखंडे (गुरुजी), प्रतिष्ठानचे राजेंद्र लोखंडे, रमेश लोखंडे, जॉर्ज लोखंडे, प्रशांत लोखंडे हे देखील पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी काम पाहत आहेत.
मतमाऊली यात्रेच्या निमित्ताने निघणारी ही पदयात्रा श्रद्धा, भक्ती आणि समाजबांधवांमधील एकात्मतेचे प्रतीक ठरणार आहे. पदयात्रेच्या मार्गातील व्यवस्था, भाविकांची सोय आणि विविध नियोजनासाठी आयोजकांकडून तयारी करण्यात येत आहे. अहिल्यानगर शहर व परिसरातील सर्व समाजबांधवांना मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होऊन मतमाऊली यात्रेचे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

