• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील मिनी ओलंपिक व राष्ट्रीय खेळाडूंचा महाराष्ट्र खेल रत्न संग्राम पुरस्काराने गौरव

ByMirror

Jan 4, 2023

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा उपक्रम

खेळात ध्येयापासून लक्ष विचलित होऊ देऊ नका -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मिनी ओलंपिक व राष्ट्रीय पातळीवरील शहरातील खेळाडूंचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र खेल रत्न संग्राम पुरस्काराने गौरव करण्यात आला.

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते खेळाडूंचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार झाला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी क्रीडा सेलचे अध्यक्ष घनश्याम सानप, प्रशिक्षक अमोल काजळे, धर्मनाथ घोरपडे, अभिजीत दळवी, अलीम शेख, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, संतोष ढाकणे, ओबीसी सेलचे अमित खामकर, भरत गारुडकर, निलेश बांगरे, महेश आनंदकर, विशाल बेलपवार आदी उपस्थित होते.


युवकचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर प्रास्ताविकात म्हणाले की, पालकांच्या प्रोत्साहनाने युवा वर्ग मैदानी खेळाकडे वळत आहे. खेळात करिअर घडविण्याच्या दृष्टीने युवक प्रयत्नशील असून, त्यांनी राष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारली आहे. शहरातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला आहे. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र खेल रत्न संग्राम पुरस्कार दरवर्षी दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहरातील खेळाडूंनी मिनी ओलंपिक स्पर्धेपर्यंत मारलेली मजल शहराच्या दृष्टीने भूषणावह आहे. ओलंपिक मध्ये जाण्याची ही पूर्वतयारी असून, नगरच्या मातीतले खेळाडू नक्कीच ओलंपिक स्पर्धेत चमकणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तर खेळात ध्येयापासून लक्ष विचलित होऊ देऊ नका. लक्ष विचलित करण्यासाठी विरोधक तयारीत असतात. आई-वडिल मोठे कष्ट घेऊन मुलांना घडवित असतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेऊन ध्येयापासून मागे न हटण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.


या कार्यक्रमात आर्चरी (धनुर्विद्या)- गारगी चव्हाण, जागृती कुंदे, श्रेया रोकडे, साई बोरकर, साक्षी एडके, रायफल शुटींगला इंडियन टीम ट्रायल्ससाठी निवड झालेले खेळाडू- यश कदम, रोनक टोकशीया, भारती आचार्य, रोशनी शेख व रायफल शुटींगचे राष्ट्रीय खेळाडू- ओम सानप, विराज चव्हाण, पार्थ छाजेड, विहंग शेंडगे, गौरव खेडकर, आर्यन पाठेकर, मोहित गवई, देवेश चतूर, गौरव घोडके, विना पाटील, आदिती भिसे, मंजू खाडे, प्रेरणा राऊत, वशु खेळ- निकिता चव्हाण, सुशांत ढगे, अविनाश शिंदे, तायक्वांदो- शिल्पा पगारे, मयूर अडागळे, सुरज कोलते, युवराज लोखंडे, अनिल तोडकर, बेंच प्रेस (पॉवर लिफ्टिंग)- युवराज पटारे, बॅडमिंटन हर्ष कटारिया, विधी सैनी, कराटे- इशान होशिंग यांना महाराष्ट्र खेल रत्न संग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सानप यांनी केले. आभार अमोल काजळे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *