• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

मतिमंद मुलांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी पेपर प्लेट बनविण्याची मशीन भेट

ByMirror

Nov 16, 2022

क्रेडाई वुमन्स विंग ग्रुपचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मतिमंद मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणार्‍या मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्सना उद्योग केंद्रास क्रेडाई वुमन्स विंग ग्रुपच्या वतीने पेपर प्लेट तयार करण्याची मशीन भेट देण्यात आली. बालदिनानिमित्त क्रेडाई वुमन्स विंग ग्रुपच्या महिला सदस्यांनी या कार्यशाळेला भेट देऊन हा उपक्रम राबविला.


या ग्रुपच्या अध्यक्षा सोनाली अमित मुथा व महिला सदस्यांनी ज्योत्सना उद्योग केंद्राकडे पेपर प्लेट बनविण्याची मशीन सुपुर्द केली. मतीमंद मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ज्योत्सना उद्योग केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. या मशीनद्वारे विद्यार्थ्यांना पेपर डिश, फाईल व नाश्ता प्लेट तयार करता येणार आहे.

मतिमंद मुलांसह बालदिन साजरा करुन विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचा मतिमंद मुलांनी आनंद लुटला. मतिमंद विकास शिक्षण मंडळाच्या वतीने भाऊसाहेब कदम यांनी आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *