• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

सावेडीत भजन भक्तीच्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

ByMirror

Oct 19, 2022

स्वरानंद भजनी मंडळाचा कलाविष्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडीतील गुलमोहर रोड, आनंदनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन भक्तीचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. कुमुदिनी मधुसूदन बोपर्डीकर यांच्या स्वरानंद भजनी मंडळाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. मन प्रफुल्लित करनारी अप्रतिम भक्ती गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.


रामकृष्ण कन्स्ट्रक्शन व क्षीरसागर परिवाराच्या वतीने या धार्मिक भजन भक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सावेडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजन भक्तीसह पारंपरिक नृत्य, ओवी, देवाचे गाणे असा सुंदर कार्यक्रमाचा नागरिकांनी मनमुराद आनंद घेतला.


बहारदार कार्यक्रम सादर करणारे कुमुदिनी बोपर्डीकर यांचा सत्कार स्नेहल सुहास क्षीरसागर, सुहास क्षीरसागर व केतन क्षीरसागर यांनी केला. यावेळी रेश्मा आठरे, श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्टचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते, घटे सर, फुंदे ताई, श्रिया देशमुख, सौ. गुंड, सौ. खोसे, सौ. गोरे, सौ. राऊत, सौ. गाजरे, सौ. कुलकर्णी, सौ. जोशी, बडे सर, देशपांडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *