• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

फ्लाय हाय फाऊंडेशनच्या द कार्निव्हल कार्यक्रमात विद्यार्थ्यांची धमाल

ByMirror

Oct 18, 2022

फ्लाय हाय फाऊंडेशनचे समाज घडविण्याचे कार्य -राजेंद्र भोसले

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात वंचित घटकातील मुलांना आधार देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी शहरात सुरु झालेल्या फ्लाय हाय फाऊंडेशनच्या वतीने द कार्निव्हल 2.0 कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळ, संगीत, चित्रकला स्पर्धा, संमोहन शो चा आनंद लुटून धमाल केली. यामध्ये स्नेहालय व आनंदऋषीजी अपंग विद्यालयातील विद्यार्थीही सहभागी झाले होते.


जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या कार्यक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी दिपाली भोसले, डॉ. वसंत गांधी, डॉ. विजय भंडारी, डॉ. रवी मुथा, डॉ. संतोष राठोड, डॉ. परेश गांधी, डॉ. स्वाती चंगेडिया, डॉ. राकेश गांधी, डॉ. अमोल भंडारी, डॉ. रोहित गांधी, डॉ. प्राची गांधी, डॉ. निकिता कटारिया आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


शिल्पा गार्डन येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविकात गौरी मुथा यांनी फ्लाय हाय फाउंडेशन ही एनजीओ वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोफत काम करते. फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व इंग्रजीचे धडे देत असून, कला व क्रीडा सारख्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. टाळेबंदीत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी फ्लाय हाय फाऊंडेशनची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. मुलांना केवळ शिकवणेच नाही, तर भविष्यात त्यांची उपजीविका सुरक्षित ठेवणारी कौशल्ये त्यांना विकसीत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी फ्लाय हाय फाऊंडेशन समाज घडविण्याचे कार्य करत आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून युवक-युवती वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दिशा देऊन त्यांना चांगला माणुस घडविण्याचे करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांनी बनवलेल्या दिवाळीच्या शुभेच्छापत्र उपस्थित पाहुण्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर विद्यार्थ्यांनी ताव मारला. मुलींनी हातावर मेहंदी तर विद्यार्थ्यांनी टॅटू रंगवले. चित्रकला स्पर्धा भरत पवार व प्रवीण नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वंचित घटकातील मुलांसाठी सुरु असलेल्या फ्लाय हाय फाऊंडेशनच्या उपक्रमास अनेकांनी आर्थिक मदत दिली.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फ्लाय हाय फाऊंडेशनच्या शिक्षक संघ मंजू मुथा, गौरी मुथा, राधा मुथा, स्वयं शेटिया, सिद्धी झिने, आदित्य कोतकर, दिया पोपटानी, अंकुश ठोकळ, आंचल मुनोत, साहिल गांधी, सुजल गांधी, आयुष मुथा, युग मुथा, संचित कोतकर, मोहसीन सय्यद यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *