• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात महात्मा गांधी जयंती साजरी

ByMirror

Oct 4, 2022

महात्मा गांधींनी दाखवलेला सत्य, अहिंसेचा मार्ग भावीपिढीसाठी दिशादर्शक -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नवनाथ विद्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.


शाळेत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सार्थक कापसे, ओम कापसे, यश कापसे, प्रतिक ठाणगे, केतन कापसे, तुकाराम खळदकर, प्रतिभा डोंगरे, विशाल जाधव, सुरज पुंड आदी उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, महात्मा गांधींनी दाखवलेला सत्य, अहिंसेचा मार्ग आजही भावीपिढीसाठी दिशादर्शक आहे. त्यांनी आपल्या विचारातून क्रांती घडवली. अशा महापुरुषांच्या विचार आत्मसात करुन त्यांच्या कार्याची प्रेरणा घेतल्यास जीवनात यश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. किसन वाबळे यांनी गांधीजींचे आदर्शाचे अनुकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी यांच्या जीवनचरित्रावर भाषणे सादर केली. या जयंती कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *