• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

न्यू आर्ट्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

ByMirror

Oct 15, 2022

महापुरुषांच्या वाचनाचा वारसा तरुणांनी पुढे चालवावा -सुदाम देशमुख

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात भाषा मंडळाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला. भारताचे दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते.

या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार सुदाम देशमुख होते. या प्रसंगी ते म्हणाले की, जगभरात जे-जे महापुरुष होऊन गेले, त्यांनी इतिहास घडविला हे महापुरुष प्रगल्भ वाचनानेच घडले. आजच्या तरुणाईने मोबाईल संस्कृतीच्या आहारी न जाता वाचन संस्कृतीकडे वळावे, हीच काळाची गरज आहे.


कार्यक्रमाचे अध्यक्ष कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधील साहित्याचे वाचन केल्यास आपले व्यक्तिमत्व प्रभावी बनते. महापुरुषांची चरित्रे आपल्या जीवनाला दिशा देण्याचे काम करतात. जीवनामध्ये संकटांचा सामना धीरोदात्तपणे कसा करावा, याची शिकवण देतात.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली भालसिंग यांनी केले. तर प्रा. डॉ. जयश्री आहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमप्रसंगी भाषा मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक गायकवाड, डॉ. नवनाथ येठेकर, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. नागेश शेळके, डॉ. विवेकानंद दोडे, प्रा. निलेश लंगोटे, प्रा. गणेश निमसे, प्रा. आनंद गडदरे, प्रा. सुखदेव लोखंडे, प्रा. अर्चना रोहोकले, डॉ. सुनीता मोटे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *