• Mon. Feb 23rd, 2026

जायंट्स ग्रुपच्या वतीने दिव्यांग बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ByMirror

Sep 23, 2022

जायंट्स ग्रुपचा सेवा सप्ताहाचा उपक्रम

समाजात जायंट्सचे सेवाभावाने योगदान -संजय गुगळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर आयोजित जायंट्सच्या सेवा सप्ताहातंर्गत दिव्यांग बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कल्याण रोड येथील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषींजी महाराज अपंग कल्याण केंद्रात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अपंग कल्याण केंद्राचे व्यवस्थापक काकासाहेब बारवकर, जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा विद्या तन्वर, नूतन गुगळे, अनिल गांधी, अभय मुथा, जायंट्स वेल्फेअरचे सदस्य संजय गुगळे, डॉ. विनय शहा, दीपक मुथा, अनिता बारवकर, यशवंती झावरे, रेखा जाधव, प्रकाश माने, राहुल ठुबे, स्नेहल दळवी, नीता गांधी, वैशाली मुथा, अमित धोका, डॉ. सतीश राजूरकर आदींसह यंग जायंट्सचे सदस्य उपस्थित होते.


जायंट्स वेल्फेअरचे संजय गुगळे म्हणाले की, समाजात जायंट्सचे सेवाभावाने योगदान सुरु आहे. वर्षभर ग्रुपचे सामाजिक कार्य सुरु असतात. कोरोना काळात तर महाराष्ट्रात आलेल्या महापूरात देखील जायंट्सने गरजूंना मदतीचा आधार दिला. समाजाच्या दुर्लक्षीत घटकांना आधार देण्याचे कार्य जायंट्स करत असल्याचे त्यांनी सांगितले.


अध्यक्षा विद्या तन्वर यांनी जायंट्स ग्रुप सेवा सप्ताहनिमित्त आरोग्य, सांस्कृतिक, शैक्षणिक त्याचबरोबर समाजोपयोगी उपक्रम राबवित येतात. तर मागील वीस वर्षापासून जनावरांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेऊन त्यांचे लसीकरण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुजा पाथुरकर यांनी प्रास्ताविकात कॅन्सर जनजागृती शिबीर, वृक्षरोपण, रक्तदान शिबीर, महानुभाव आश्रम येथे मोफत सर्वनिदान शिबीर, तसेच युवतींसाठी मेहंदी व हेअर स्टाईल स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात येत असल्याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना चित्रकला वही, रंगपेटी, कंम्पास, पेन्सिल, रजिस्टर वह्या, पाऊच बॅग, सॉक्स, थंडीनिमित्त कानटोपी, फळे व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. आभार नुतन गुगळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *