भन्ते यांना ब्लँकेटचे वाटप करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात वृक्षरोपण
तथागत बुध्दिस्ट सोसायटीचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वस्तीगृहातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे व भन्ते यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तर स्मारक परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.

अॅड. संतोष गायकवाड यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, अजय साळवे, विजय भांबळ, भन्ते प्रज्ञाशील, प्रा. विलास साठे, प्रा. जयंत गायकवाड, रोहिदास आव्हाड, संदीप वाघमारे, संध्या मेढे, शिवाजी भोसले, विष्णू ठोंबे, मिलिंद आंग्रे, सॅम्युअल वाघमारे, योगेश गुंड, अप्पा गायकवाड, अक्षय भिंगारदिवे, हर्षल कांबळे, महेश भोसले, सोमा शिंदे, दिपक अमृत, सिताताई भिंगारदिवे, सुमेध गायकवाड, दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.

संजय कांबळे म्हणाले की, तथागत बुध्दिस्ट सोसायटी सर्वसामान्य घटकांना आधार देण्याचे कार्य करत असून, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सुसंस्कारी समाज निर्मितीसाठी मुलांना शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षण देखील देण्यात येत आहे. मुले उच्च शिक्षित झाल्यास समाजाची प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनत असताना प्रत्येक नागरिकाने सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने वृक्षरोपण व संवर्धन या अभियानात योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
अॅड. संतोष गायकवाड म्हणाले की, पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलांप्रमाणे झाडे लाऊन ती वाढविण्याची गरज आहे. शाळेत लहान मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजवून वृक्षरोपण चळवळीचे संस्कार रुजविल्यास बदल घडणार आहे. गरजू घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी तथागत बुध्दिस्ट सोसायटीने उचलेले पाऊन प्रेरणादायी असल्याचे संध्या मेढे यांनी सांगितले. उत्कृर्ष वस्तीगृहातील अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात आली. वस्तीगृहाचे युवराज गुंड यांनी आभार मानले.

