• Tue. Nov 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल खासदार लंके यांचा सत्कार

ByMirror

Nov 10, 2026
निमगाव वाघात पेढे वाटून आनंदोत्सव

निमगाव वाघात पेढे वाटून आनंदोत्सव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी खासदार निलेश लंके निवडून आल्याबद्दल निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
माजी सरपंच साहेबराव बोडखे आणि ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते खासदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भागचंद जाधव, विजय जाधव, सुनील जाधव, मयूर काळे, सुखदेव जाधव, नामदेव फलके आदी उपस्थित होते.


माजी सरपंच साहेबराव बोडखे म्हणाले की, खासदार निलेश लंके यांची शेतकऱ्यांशी घट्ट नाळ जोडलेली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या आणि जनतेच्या विश्‍वासाच्या बळावर राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या व्यक्तीची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवडून येणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला झुगारून सर्वसामान्य माणूसही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचू शकतो, हे या निवडीतून अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी सांगितले.


ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे म्हणाले की, खासदार निलेश लंके यांच्या निवडीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आपला लोकप्रतिनिधी जिल्हा बँकेच्या संचालकपदी विराजमान झाल्याचा ग्रामस्थांना अभिमान वाटत आहे. जिल्हा बँक ही शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे खासदार लंके यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी, पीककर्ज, आर्थिक प्रश्‍न आणि सहकार क्षेत्रातील समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि लोकसंपर्काचा निश्‍चितच फायदा होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *