नवरात्री स्वच्छता उत्सवाचा उपक्रम; प्लास्टिकमुक्ती, सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांना हाक
नैसर्गिंक संकट व दुष्काळाला तोफ्लड देण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण कर्तव्य म्हणून करावे लागणार -पै. नाना डोफ्लगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्र उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड देत नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे कवितेच्या माध्यमातून पर्यावरण जागृती करण्यात आली. प्लास्टिकचा वाढता वापर, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि पर्यावरणापुढील विविध आव्हाने यांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काव्याच्या माध्यमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या ‘नवरात्री स्वच्छता उत्सव’ या उपक्रमांतर्गत स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने गावात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कवी रुपचंद शिदोरे यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती आणि सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला.
कवितांच्या प्रभावी सादरीकरणातून दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व काय आहे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी कशी आहे आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर कोणते दुष्परिणाम होतात, याविषयी जनजागृती करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता प्रत्येकाने आपल्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला. स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे. गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे तसेच पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे, या बाबींचे महत्त्व ग्रामस्थांना लक्षात आणून देण्यात आले.
या उपक्रमावेळी स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पै. डोफ्लगरे यांनी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे. नैसर्गिंक संकट व दुष्काळाला तोफ्लड देण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण कर्तव्य म्हणून करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या ‘नवरात्री स्वच्छता उत्सव’ उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या जनजागृतीपर कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि जल जीवनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांचे मार्गदर्शन लाभले.

