• Sat. Oct 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

ByMirror

Oct 2, 2026
महिला मेळाव्यात आरोग्य विषयी मार्गदर्शन

महिला शक्तीचा जागर काव्यातून; नवोदित कवयित्रींसाठी स्वरचित काव्य संमेलनाचे आयोजन


‘नवदुर्गा पुरस्कार’साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 ऑक्टोबर रोजी निमगाव वाघा (ता. नगर) येथे ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना यावेळी ‘नवदुर्गा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच महिला शक्तीचा जागर घडविणाऱ्या स्वरचित काव्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे.


गावात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा व काव्य संमेलन उत्साहात पार पडणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्य, साहित्य, आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग, पर्यावरण यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना ‘नवदुर्गा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. महिलांनी आपल्या कार्यातून समाजासमोर निर्माण केलेला आदर्श अधोरेखित करून त्यांच्या योगदानाला सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.


यासोबतच नवोदित कवी-कवयित्रींना आपली साहित्यिक प्रतिभा सादर करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने स्वरचित काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. आपल्या लेखणीतून महिला शक्ती, सामाजिक जाणीव, संस्कृती, निसर्ग आणि समकालीन विषयांना अभिव्यक्त करणाऱ्या कवी-कवयित्रींना या संमेलनात सहभागी होता येणार आहे. काव्याच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाचा आणि सामर्थ्याचा जागर करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.


‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’साठी विविध क्षेत्रातील पात्र आणि कर्तृत्ववान महिलांनी आपले प्रस्ताव आयोजकांकडे पाठवावेत, असे आवाहन संमेलनाचे मुख्य संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केले आहे. या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी पै. नाना डोंगरे : 9226735346 / 8605775261 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *