• Thu. Sep 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

लोणी प्रवराचा अभय जगताप ठरला कराटेचा गोल्डन बॉय

ByMirror

Sep 10, 2026
लोणी प्रवराचा अभय जगताप ठरला कराटेचा गोल्डन बॉय

राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोणी प्रवरा येथील शालेय खेळाडू अभय भाऊसाहेब जगताप याने पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात 6 सप्टेंबर 2026 BKA भारत कराटे अकादमी आयोजित या अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अभयची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.


अभय जगताप हा मूळचा नगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा येथील असून, राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने छत्रपती संभाजीनगर टीमकडून सहभाग घेतला होता. त्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी करत कुमिते प्रकारात सुवर्णपदक, तर काता प्रकारात कांस्यपदक मिळविले आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने कराटे क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.


अभय सध्या इयत्ता सहावीत शिक्षण घेत असून, वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. नियमित सराव, मेहनत, शिस्त, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर त्याने विविध कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याला शीतल जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अभयच्या या यशामध्ये त्याचे आई-वडील भाऊसाहेब जगताप व अमृता जगताप यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच्या यशाबद्दल प्रभाकर लोखंडे, रोहिणी लोखंडे, संध्या लोखंडे, प्रमिला लोखंडे, विक्रम लोखंडे, वीरेंद्र लोखंडे, राहुल जगताप व सायली जगताप यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *