राहुल ठोकळ शहर सचिव, तर प्रकाश थोरात शहर संघटकपदी नियुक्ती
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्याची चळवळ -सुशांत म्हस्के
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांसह युवकांनी रिपाइं (गवई) पक्षात प्रवेश केला. पक्षाचे शहरजिल्हा अध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.
यावेळी पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या नियुयाही जाहीर करण्यात आल्या. राहुल ठोकळ यांची शहर सचिवपदी, तर प्रकाश थोरात यांची शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी दानिश शेख, गुलाम शेख, विजय शिरसाठ, अजीम खान, लकी वाघमारे, शुभम ठोंबे, जमीर सय्यद, योहान चाबुकस्वार, जावेद सय्यद, अजीज शेख, हुसेन चौधरी, अमोल भालेराव, अजय पठारे, प्रदीप साळवे, विशांत थोरात, सचिन कणगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपाइं (गवई) पक्षाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आंबेडकरी विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांची मोठी भूमिका असून, संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले.
सुशांत म्हस्के म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) हा केवळ राजकीय पक्ष नसून सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्याची चळवळ आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांवर पक्षाचे कार्य सुरु असून, ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह युवकांचा पक्षात प्रवेश होणे ही संघटनेसाठी निश्चितच सकारात्मक बाब आहे. समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष सातत्याने संघर्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित पदाधिकारी राहुल ठोकळ व प्रकाश थोरात यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पद नसून सामाजिक बांधिलकी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक विचारांचा आणि सामाजिक समतेचा संदेश तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम केले जाणार आहे. समाजातील अन्याय, अत्याचार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांविरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष उभारला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

